योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे ते ओझर रस्त्यावरील थेरगाव येथे शेतकरी वारकरी समन्वयक समितीच्या वतीने आज दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होळी सणाच्या दिवशी महावितरणच्या वीज बिलांची होळी करत महावितरण कंपनीचा शेतकऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
थेरगाव आणि कसबे सुकेने परिसरातही सक्तीची वीज वसुली सध्या राज्य सरकारकडून होत असून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणने घेतली आहे, याला विरोध म्हणून आज दिनांक 6 मार्च होळीच्या सणाच्या निमित्ताने शेतकरी वारकरी समन्वयक समितीचे भगवान बोराडे व थेरगाव येथील शेतकरी यांनी होळीमध्ये वीजबिले टाकत या वीज बिलांची होळी केली, शेतकरी वारकऱ्यांनी राज्य सरकारच्या जुलमी निर्णयाविरुद्ध गावोगावी वीज बिलांची होळी करावी, असे आवाहन शेतकरी वारकरी समन्वयक समितीने केले होते.
त्यानुसार आज आम्ही होळी करत सरकारचा जाहीर निषेध करत आहोत, अशी माहिती भगवान बोराडे यांनी दिली. यावेळी पोपटराव बोराडे, हेमंत गवारे, तेजस बोराडे, अनिकेत जाधव, वैभव बोराडे, अनिकेत ढेरंगे, आकाश जाधव व थेरगाव व परिसरातील शेतकरी वारकरी समन्वयक समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Angry Farmers Electricity Bill Holi in Nashik District