अयोग्य आहार आणि ताणतणावची जीवनशैलीमुळे कधीकधी अंगदुखी इतकी तीव्र होते की, शरीरातील वेदना सहन होत नाहीत. खरे म्हणजे सर्वसामान्यपणे ही समस्या कोणालाही होऊ शकते. मुख्यतः शरीरात जीवनसत्त्वांचा अभाव, थकवा, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव किंवा बदलत्या हवामानामुळे ही समस्या उद्भवू शकते.तसेच शरीरातील वेदना सामान्य ते अत्यंत तीव्र पण असू शकतात. या वेदना कमी करण्यासाठी पेन कीलर औषधे घेणे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. पेन किलर्सच्या वापरामुळे दुष्परिणामांचा धोका जास्त असतो. आपण देखील अंग दुखण्याने त्रस्त असाल, तर आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करून उपचार करा.
सफरचंद : सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन केल्याने शरीरातील वेदना दूर होतात. त्यात असलेले वेदना-विरोधी, सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म शरीराची जळजळ आणि वेदना कमी करतात. एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर, एक चमचा मध घालून त्याचे सेवन करा. तसेच पाणी आणि मध सह व्हिनेगरचे सेवन केल्याने शरीरातील दुखण्यापासून आराम मिळतो.
आद्वक किंवा आले वापरा: आल्यामध्ये असलेले वेदनशामक घटक शरीरातील वेदना दूर करण्यास मदत करतात. आल्याचे काही तुकडे एका कप पाण्यात घालून काही मिनिटे उकळू द्या. उकळल्यानंतर ते गाळून ते सेवन करा. तुम्ही अदरक चहामध्ये टाकून देखील सेवन करू शकता, वेदना कमी होतील.
मोहरीच्या तेलाने मालिश करा: शरीरातील वेदना कमी करण्यासाठी मसाज ही एक अतिशय प्रभावी थेरपी आहे, त्यामुळे रक्तभिरण सुधारते आणि शरीरातील वेदनांपासूनही आराम मिळतो. मसाजसाठी मोहरीचे तेल वापरा. मोहरीच्या तेलात लसणाची एक -दोन पाकळी शिजवून थंड करून मसाज करा, तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल.
आहारात आवश्यक जीवनसत्त्वे समाविष्ट करा: शरीरात वेदना होत असतील तर आहारात व्हिटॅमिन बी 1, डी, ई सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करा. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे नसा आणि स्नायूंना नुकसान होऊ शकते. ही जीवनसत्त्वे शारीरिक कमजोरी आणि वेदनांपासून आराम देतात.