मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना भाऊबीज निमित अंगणवाडी सेविकांनी ओवाळत विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. आंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय दर्जा मिळावा, मानधनात वाढ करुन निवृत्तीवेतन मिळावे यासह अन्य मागण्या पुर्ण करण्याची सरकारने ओवाळणी टाकून मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी या निमित्ताने पालकमंत्री भुसे यांच्याकडे करण्यात आली. राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचा-यांना तुटपुंजे वेतनावर काम करावे लागत आहे.अनेक वेळा मागणी करुन आंदोलन करुनही त्याचा उपयोग झालेला नाही,त्यामुळे या सेविकांनी भाऊबीज निमित्त पालकमंत्री भुसे यांची ओवाळणी करत या मागण्या त्यांच्या पुढे ठेवल्या.