पुणे – प्रत्येकाकडे असलेल्या अँड्रॉइड डिव्हाइसकडून परवानगी नसली तरी तुमचा डाटा ट्रॅक केला जातो. काही अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये काही सिस्टिम अॅप्स असतात. हे अॅप्स अँड्रॉइड डिव्हाइस किंवा ब्लोटवेअरसोबत आधीपासूनच इन्स्टॉल असतात. ते बॉक्सच्या बाहेरच असतात. ओएसचे डेव्हलपर आणि विविध थर्ड पार्टींना युजर्सचा डाटा परत पाठवला जातो. ते अॅप्स सिस्टिम अॅप कॅमेरा किंवा मेसेज अॅपसारख्या काही फंक्शनॅलिटी प्रदान करू शकतात. परंतु युजर्सनी ते कधीही उघडले नसले तरीही ते ओएसला डाटा पाठवतात.
डबलिनमधील ट्रिनिटी कॉलेजच्या संशोधनानुसार युजर्स जोपर्यंत आपल्या डिव्हाइस रूट करण्याचा निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत या सिस्टिम अॅप्समधून डाटा ट्रॅकिंग ऑप्ट-आउट करण्याचे कोणतीच पद्धत नाही. कारण हे अॅप साधारण रिड ओनली मेमरी (ROM) मध्ये पॅक केले जातात.
संशोधकांनी samsung, Xiaomi, Huawei आणि Realme तर्फे विकसित अँड्रॉइड ओएसच्या लोकप्रिय व्हेरिएंटचे संशोधन केले. त्यांनी अँड्रॉइडच्या Lineage OS आणि /e/OS या ओपन सोर्स व्हेरिएंटद्वारे शेअर केलेल्या डाटासंदर्भातही अहवाल तयार केला. संशोधकांनी उल्लेख केला आहे की या बाजाराचा सर्वात मोठा भाग सॅमसंगकडे आहे. त्यानंतर Xiaomi, Huawei आणि Oppo आहे. Realme ही या कंपन्यांची मूळ कंपनी आहे.
अँड्रॉइडसाठी पहिल्यापासूनच इन्स्टॉल करण्यात आलेल्या थर्ड पार्टी सिस्टिम अॅप म्हणजेच ओएस डेव्हलपरकडून न लिहिण्यात आलेल्या अॅप्सना सहभागी करून घेणे सामान्य गोष्ट आहे. उदाहरणार्थ गुगल अॅप्सचे तथाकथित जी अॅप्स पॅकेज आहे. इतर उदाहणांमध्ये मायक्रोसॉफ्ट, लिंक्डइन, फेसबुक मध्ये पूर्वीपासूनच इन्स्टॉल करण्यात आलेले सिस्टिम अॅप आहेत.