मुंबई – आपण अँड्रॉइड मोबाईल फोन वापरकर्ते असाल तर आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, एक धोकादायक मालवेअर आपल्या डिव्हाइसमध्ये डोकावून सर्व डेटा चोरू शकतो. तज्ज्ञांनी या मालवेअरला व्हल्टर असे नाव दिले आहे, ते आपल्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर येणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करते.
लॉगिन आणि संकेतशब्दांपासून इंटरनेट इतिहास, बँक तपशील आणि अगदी आपले खासगी मजकूर संदेश, सोशल मीडिया मेसेजपर्यंत सर्व काही रेकॉर्ड केले जाऊ शकते. या अहवालानुसार, व्हल्टर एक बँकिंग ट्रोजन असून ते बँकेचे तपशील चोरणारे मालवेअर इतर बँकिंग ट्रोजनपेक्षा अगदी वेगळे आहे. इतर मालवेअर हे वापरकर्ते बनावट वेबसाइटद्वारे खात्याचे तपशील भरतात आणि त्यानंतर ते चोरतात. त्याचवेळी, व्हल्टर थेट वापरकर्त्याच्या डिव्हाइसची स्क्रीन रेकॉर्ड करून खात्याची माहिती चोरतो. याचा अर्थ असा की, आपण मूळ वेबसाइटवर लॉग इन केले तरीही आपण फसवले जाऊ शकता.
मोबाईल सिक्युरिटी वेबसाइट फॅब्रिकच्या तज्ज्ञांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, सदर मालवेअर या वर्षी मार्चमध्ये समोर आले असून हे मालवेअर गुगल प्ले स्टोअरवरील अॅपद्वारे सर्वत्र पसरवण्यात आले आहे. तसेच हजारो वेळा डाउनलोड केले गेले आहे. मात्र, गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप काही काळासाठी काढून टाकण्यात आले आहे.