नाशिक – केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जनता विरोधी धोरणामुळे होणाऱ्या दिवसेंदिवस घरगुती गॅस डिझेल पेट्रोल व जीवनावश्यक सर्व वस्तूंi महाग झाले आहेत. यात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या भरमसाठ वाढलेल्या महागाईविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शनिवारी महागाईविरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व जनतेने आपआपल्या परिसरात मोर्चात सहभागी होऊन सरकारच्या धोरणांचा निषेध करावा असे आवाहन माकपचे नाशिक शहर सेक्रेटरी अँड. वसुधा कराड, राज्य कमिटी सदस्य. सिताराम ठोंबरे. जिल्हा कमिटी सदस्य दिनेश सातभाई यांनी केले आहे.
सातपुर विभाग
– काँ. सिंधू ताई शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली सातपूर जुने सीटू ऑफीस पासून सातपूर गावातून मोर्चा काढण्यात येणार आहे. ई एस आय सी हॉस्पिटल समोर मोकळ्या जागेवर समारोप करण्यात येईल.
– काँ. दगडू व्हडगर,काँ. भिवाजी भावले ,काँ. भागवत डुंबरे काँ. मोहन जाधव काँ.संजय पवार का.गौतम कांबळे काँ. विनोद भाऊस्कर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर भाजी मार्केट महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी सातपूर येथून मोर्चा काढून अशोक नगर भाजी मार्केट येथे समारोप करण्यात येईल.
सिडको विभाग
– काँ.आत्माराम डावरे काँ.ज्ञानेश्वर काजळे काँ. गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी फाटा पासून मोर्चा काढून अंजना लॉन जवळ समारोप करण्यात येईल .
– काँ. तानाजी जायभावे, का.तुकाराम सोनजे काँ.संतोष काकडे काँ.सतिश खैरनार काँ.दीपक कोर काँ.अरविंद शहापुरे काँ.विवेक ढगे काँ. ज्ञानेश्वर माळी काँ संजय माळी काँ. दीपक घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सिडको त्रिमूर्ती चौक पासुनच्या रॅलीने पवन नगर ग्राउंड पर्यंत तसेच उत्तम नगर पासून पवन नगर ग्राउंड वरती समारोप करण्यात येईल .