सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीसह २ मुलींना नदीत ढकलले… एक मुलगी बचावली… समोर आला हा धक्कादायक प्रकार…

ऑगस्ट 7, 2023 | 5:14 pm
in संमिश्र वार्ता
0
download 84

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिव्ह इन पार्टनरने आपल्या प्रेयसीसह तिच्या दोन मुलींना चक्क गोदावरी नदीत ढकलले. सुदैवाने यातील एका मुलीने प्लास्टिकच्या पाईपला पकडले. त्यात ती बचावली. पण, या मुलीची आई आणि बहिण बेपत्ता आहे.

गोदावरी नदीच्या पुलावरुन एकाच कुटुंबातील तिघींना खाली ढकलल्यानंतर त्यातील एका मुलीने स्वत:चे प्राण वाचवले. रविवारी पहाटे पुलावरुन ढकलल्यानंतर या मुलीने प्लास्टिकच्या पाईपला पकडले. त्यानंतर लटकलेल्या अवस्थेत तिने पोलिसांना १०० नंबरला फोन लावला. पोलिसही तातडीने आले व हायवे पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका केली. पण, या मुलीची आई व बहिण मात्र बेपत्ता आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

आईच्या लिव्ह इन पार्ट्नर असलेल्या सुरेशने या तिघींना ब्रिजवरुन ढकलून दिले. यावेळी मुलीची आई सुहासिनी (३६) आणि तिची बहिण जर्सी (१) सोबत होते. सुरेशने जेव्हा या अल्पवयीन मुलगी गौतमीला ब्रिजवरुन ढकलले तेव्हा मुलीने खाली पडताना ब्रिजला लागून प्लास्टिकचा पाईप पकडला. त्यानंतर तीने स्वत:च्या खिशातून मोबाइल फोन काढला व मदतीसाठी पोलिसांना १०० नबर डायल केला. रविवारी पहाटे ३.५० च्या सुमारास पोलिसांना हा मदत मागणारा फोन आला. त्यानंतर अवघ्या १० मिनीटात पहाटे ४ वाजता पोलिस घटनास्थळी पोहोचले.

ब्रिजला लागून असलेल्या पाईपला त्यांना मुलगी लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर पोलिसांनी हायवे पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका केली. या घटनेबाबत गौतमीने पोलिसांना सांगितले की, सुरेश हा माझ्या आईसोबत लिव्ह इन पार्ट्नरमध्ये रहात होता. तो आम्हाला तिघींना ब्रिजवर घेऊन गेला. येथे त्याने गाडी थांबवली. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याने आम्हाला बाहेर बोलावले. आम्हाला तिघींना त्याने गोदावरी नदीत ढकलून दिले.

Andhra Pradesh Guntur Crime Live in Partner
Godavari River Bridge Thrown Away

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवारांची पुन्हा गुगली… राष्ट्रवादीतील फुटीबाबत निवडणूक आयोगाला दिले हे पत्र… चर्चांना उधाण

Next Post

एकाचवेळी तब्बल ६०० जावयांना लावले वाण… धोंड्याचा आगळावेगळा सोहळा… शिजवले चक्क एवढे पुरण… सर्वत्र चर्चा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
F22z8LgXUAMauWt

एकाचवेळी तब्बल ६०० जावयांना लावले वाण... धोंड्याचा आगळावेगळा सोहळा... शिजवले चक्क एवढे पुरण... सर्वत्र चर्चा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011