अमरावती (आंध्र प्रदेश) – एकीकडे रामदेवबाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्यात औषध प्रकरणावरून वाद सुरू असतानाच आता आंध्र प्रदेश मध्ये मात्र कोरोनावर उपचारसाठी नव्हे तर सहाय्यक किंवा प्रतिबंधक म्हणून आयुर्वेदिक औषधांच्या वाटपाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे वादग्रस्त ठरलेल्या आनंदाय्या या कंपनीने ही आयुर्वेदिक औषधे तयार केली आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने आयुर्वेदिक चिकीत्सक आनंदाय्या कंपनीने बनवलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या वितरणाला मान्यता दिली असून यात डोळ्यात टाकण्याच्या ड्रापचा मात्र समावेश नाही. आनंदाय्या चार प्रकारच्या औषधे आणि डोळ्याच्या ड्रॉपची तयारी करत होते.
राज्य सरकारने तीन प्रकारच्या औषधांना परवानगी दिली आहे. केंद्रीय आयुर्वेदिक अभ्यास संशोधन समितीच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. डोळ्याच्या ड्रापचा संपूर्ण अहवाल अजून येणे बाकी आहे. आनंदय्याच्या औषधांचा वापर केल्याने कोणतीही हानी होत नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
तथापि, अहवालानुसार, कोविड -१९ च्या उपचारात या औषधे वापरली जाऊ शकत नाहीत. राज्य सरकारने तीन औषधांच्या वितरणासाठी परवानगी दिली आहे. नियमित औषधे लिहून देण्याबरोबरच ही औषधे वापरली जाऊ शकतात. तसेच आयुर्वेदिक औषधे वाटप करताना कोविड -१९ ची नियमावली पाळली पाहिजे, अशी राज्य सरकारच्या आरोग्य खात्याची सूचना आहे.
टीडीपीचे नेते सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांनी सांगितले की, २१ मे रोजी आनंदय्या कंपनीने नेलोरमधील कृष्णापट्टनम शहरात कोविड -१९ या उपचारासाठी हर्बल औषध वितरित केले जात होते, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव पोलीसांनी आयुर्वेदिक चिकित्सक आनंदाय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
परंतु काही कारणास्तव काही तासांनी त्यांना तेथून सोडून देण्यात आले. स्थानिक वायएसआरसीपी आमदारांच्या आदेशानुसार आनंदाय्याला आयुर्वेदिक मिश्रणाचे हजारो डोस तयार करण्यास भाग पाडले गेले आहे.