बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणूक- भाजपने माघार का घेतली? काय आहे यामागचे राजकारण?

by India Darpan
ऑक्टोबर 17, 2022 | 2:56 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराने माघार घेतली आहे. या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. आज दुपारी भाजपने या निवडणुकीतून माघारीची घोषणा केली आहे. आता ऋतुजा बिनविरोध विजयी होईल, असे मानले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पण, भाजपने उमेदवारी मागे का घेतली याची आता चर्चा सुरू झाली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा ती मुंबई महापालिका निवडणुकीची सेमीफायनल मानली गेली. या पोटनिवडणुकीच्या निकालाचा संदेश मुंबई महापालिकेपर्यंत जाईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे ही लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.

अंधेरी पूर्व विधानसभेसाठीची लढत खूपच रंजक असणार होती. उद्धव गटाच्या उमेदवार या मराठी तर गुजराती असलेल्या मुरजी पटेल यांना भाजप-शिंदे गटाने उमेदवारी दिली. ही निवडणूक गुजराती विरुद्ध मराठी अशी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. कारण या जागेवर हिंदी आणि मराठी भाषिक मतदारांचे वर्चस्व आहे. काही मोजक्याच भागात गुजराती लोकसंख्या आहे. रमेश लटके यांनाही मराठी मतदार एकदिलाने मतदान करत होते. २०१४ च्या मोदी लाटेतही ते या जागेवरून विजयी झाले होते. एवढेच नाही तर या निवडणुकीत उद्धव यांच्या उमेदवाराच्या बाजूने सहानुभूतीच्या मतांची लाट येण्याची दाट शक्यता होती.

या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचा पराभव झाला असता, तर आगामी मुंबई महापालिका निवडणूक कठीण होऊ शकली असती. ५० हून अधिक आमदार आणि १२ खासदारांसह संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडाचा सामना केल्यानंतर उद्धव ठाकरे कमजोर दिसत आहेत. अशा स्थितीत ठाकरे गटाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या असत्या तर ठाकरे गटाने ही लढाई जिंकली असती. तसेच, त्यांच्या छावणीला खुपच प्रोत्साहन मिळाले असते. हाच उत्साह ठाकरे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा ठरला असता. ही बाब हेरुनच भाजपने उमेदवार मागे घेतल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू राज ठाकरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र, राज ठाकरे यांनी रविवारी पत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला.शिवाय भाजपनेही माघार घ्यावी, अशी विनंती केली.  आता याच विनंतीला मान देऊन भाजपने उमेदवार मागे घेतला आहे. मात्र, सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप आणि राज ठाकरे यांची अंतर्गत हातमिळवणी आहे. राज यांनी पत्र लिहावे असे भाजपनेच सूचित केल्याचेही बोलले जात आहे.

Andheri Bypoll Election BJP Political Stand

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील मोठ्या बँक घोटाळ्यांमध्ये RBIच्या अधिकाऱ्यांचाही हात? सुप्रिम कोर्टाची नोटीस

Next Post

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या निर्णयानंतर पुन्हा राज ठाकरे यांचे फडणवीसांना पत्र; आता म्हणाले….

India Darpan

Next Post
raj thakre

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या निर्णयानंतर पुन्हा राज ठाकरे यांचे फडणवीसांना पत्र; आता म्हणाले....

ताज्या बातम्या

crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011