मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत १५ व्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे :
मुंबई उपनगर जिल्हा – अंधेरी पूर्व पोटनिवडणूक विशेष
दि. ६ नोव्हेंबर २०२२ – मतमोजणी निकाल –
१९व्या फेरी अखेर
१) श्रीमती ऋतुजा लटके- ६५३३५
२) श्री.बाला नाडार – १४८५
३) श्री.मनोज नायक – ८७५
४) श्रीमती नीना खेडेकर- १४८९
५) श्रीमती फरहाना सय्यद- १०५८
६) श्री.मिलिंद कांबळे- ६०६
७) श्री.राजेश त्रिपाठी- १५५०
नोटा – १२६९१
एकूण मते : ८५०८९
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी https://t.co/9uarAEAhu5
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) November 6, 2022
अंधेरी पूर्व’ या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु झाली आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय किती मतांनी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यानुसार व्यवस्थापन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस उपस्थित आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.
आज सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ८.३० वाज़ता ‘ईव्हीएम’ यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात झाली. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) आहे. ‘ईव्हीएम’ आधारित मतमोजणीसाठी १४ मेज आहे. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या ‘एलसीडी स्क्रीन’वर देखील दाखविण्यात येत आहे.
Andheri By Poll Assembly Election 8th Round Counting Result