मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी पूर्व विधानसभा‘ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व‘ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.
Andheri Assembly Bypoll Election Voting Holiday