मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून पारंपरिकरित्या बांधणी केलेले जहाज नौदलाच्या सेवेत दाखल होणार

by Gautam Sancheti
मे 20, 2025 | 3:37 pm
in राष्ट्रीय
0
Pic314WNM e1747735624899

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय नौदलाच्या वतीने २१ मे रोजी, कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला (Ancient Stitched Ship) समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही अनावरण केले जाणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून, ते या समारंभाचे अध्यक्षस्थानही भूषवतील. त्यांच्या हस्तेच हे जहाज औपचारिकपणे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील केले जाणार आहे.

प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून बांधलेले हे जहाज, अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून प्रेरणा घेत साकारलेली ५ व्या शतकातील एका जहाजाची प्रतिकृती आहे. जुलै २०२३ मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर, या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली होती. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने आर्थिक पाठबळ पुरवले होते. या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीची मुहूर्तमेढ १२ सप्टेंबर २०२३ रोजी झाली होती. (https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1956754).

प्राचीन शिलाई तंत्राचा वापर असलेल्या या जहाजाची, संपूर्ण बांधणी पारंपरिक पद्धतीने आणि परंपरागत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करूनच केली गेली आहे. केरळमधील आघाडीचे जहाज बांधणी कारागीर बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील कारागिरांच्या हजारो हातांनी शिलाई तंत्राचा वापर करून जहाजाच्या सांध्यांची बांधणी केली आहे. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये गोव्यातील मेसर्स होडी शिपयार्डमध्ये या जहाजाचे जलावतरण केले गेले होते. (https://x.com/indiannavy/status/1895045968988643743).

हे जहाज नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर, या प्रकल्पाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्याअंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने या जहाजाच्या पारंपरिक सागरी व्यापारी मार्गांवरून महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक सागरी सफरीचा प्रारंभ केला जाईल. या जहाजाच्या सागरी सफरीमुळे भारताच्या प्राचीन सागरी वाहतुकीचे युग पुन्हा जिवंत झाल्याचा अनुभव घेता येणार आहे. या जहाजाच्या पहिल्या वहिल्या सागरी सफरीअंतर्गत गुजरातपासून ते ओमानपर्यंतची आंतरमहासागरीय सफरीची तयारी नौदलाने सुरू केली आहे.

प्राचीन शिलाई तंत्राने बांधलेल्या या जहाजाची बांधणी प्रत्यक्षात पूर्णत्वाला जाण्याच्या या घटनेतून भारताच्या समृद्ध जहाज बांधणीच्या वारशासोबतच, भारताच्या सागरी वारशाच्या जिवंत परंपरांचे जतन करत, त्यांना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची भारतीय नौदलाची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेताच नाशिकचे पालकमंत्री करण्याची मागणी…बॅनरही झळकले

Next Post

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात ‘नो ड्रोन प्लाय झोन’ घोषित

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 34

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात ‘नो ड्रोन प्लाय झोन’ घोषित

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011