नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील विख्यात बांधकाम व्यवसायिक व क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांची राष्ट्रीय क्रेडाई तर्फे रियल इस्टेट डेव्हलपमेंट अकॅडमी चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी अनंत राजेगावकर यांनी क्रेडाई मध्ये विविध महत्त्वाची पदे भूषवली असून महाराष्ट्रात व देशात क्रेडाई च्या विस्तारामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
याचसोबत क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाईच्या युथ व वुमन विंगचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निशित अटल यांची राष्ट्रीय क्रेडाई युथ विंगचे पश्चिम विभागीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच सोबत शुभम राजेगावकर, सुशांत गांगुर्डे, अजिंक्य नाहर व अभिषेक मोरे यांची नियुक्ती राष्ट्रीय क्रेडाई चे सदस्य म्हणून करण्यात आली आहे. या सर्वांचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, राष्ट्रीय क्रेडाई च्या घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर व महाराष्ट्र क्रेडाईचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल यांनी अभिनंदन केले आहे.
Anant Rajegaonkar National Credai Selection