इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंबानी कुटुंबात आज पुन्हा एकदा जल्लोषाचे वातावरण आहे. नुकतेच मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्याचवेळी मुकेश आणि नीता यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा आज साखरपुडा झाला आहे. अनंत अंबानी आणि प्रसिद्ध नृत्यांगना राधिका मर्चंट यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हा खास सोहळा पार पाडण्यासाठी संपूर्ण अंबानी आणि व्यापारी कुटुंब राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजी मंदिरात पोहोचले. या जोडप्याच्या साखरपुडा समारंभातील पहिले चित्र समोर आले आहे. समोर आलेला हा फोटो थोडासा अस्पष्ट आहे, पण चित्रात अनंत आणि राधिका दिसत आहेत. यावेळी अनंत निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा तर राधिका लाइट पिंक आणि रेड कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये राधिका दिसली आहे. आता लवकरच ती अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे.
या जोडप्याच्या साखरपुडा समारंभानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले- नाथद्वाराच्या श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा सोहळ्यासाठी प्रिय अनंत आणि राधिकाचे हार्दिक अभिनंदन. भगवान श्रीनाथजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.
Heartiest congratulations to dearest Anant and Radhika for their Roka ceremony at the Shrinathji temple in Nathdwara. May Lord Shrinath ji’s blessings be with you always. #AnantAmbani pic.twitter.com/BmgKDFsPYh
— Parimal Nathwani (@mpparimal) December 29, 2022
अनंत आणि राधिका काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि आजचा समारंभ येत्या काही महिन्यांत त्यांच्या औपचारिक विवाह प्रवासाची सुरुवात करेल. राधिका आणि अनंत यांचा एकत्र राहण्याचा प्रवास सुरू करताना दोन्ही कुटुंबे सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतले. अनंतने यूएसए मधील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डवर सदस्य म्हणून विविध पदांवर काम केले आहे. ते सध्या आर आय एल च्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख आहेत. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.
राधिका एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना
कोण आहे राधिका मर्चंट, कोण होणार अंबानी कुटुंबाची धाकटी सून, काय करते ती, असे प्रश्न सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राधिका ही वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन हे एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. राधिका आणि अनंत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. राधिका ही एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. या वर्षी जूनमध्ये अंबानी कुटुंबाने राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम सोहळा आयोजित केला होता. त्यास नीता आणि मुकेश अंबानींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. २०१८ मध्ये राधिका आणि अनंत या दोघांचाही फोटो पहिल्यांदाच मीडियामध्ये व्हायरल झाला होता. आकाश अंबानी आणि ईशा अंबानीच्या लग्नात हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.
Anant Ambani Engagement Ceremony Today
Ambani Family Mukesh Nita Industrialist Radhika Merchant Dancer