इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेतील नाव आहे. समाजातील अनेक चांगल्या गोष्टी ते सातत्याने लोकांच्या नजरेत आणत असतात. यातील अनेकांना प्रोत्साहन म्हणून ते नोकरीची संधी देत असतात. ते सोशल मीडियावर नवीन वाहनांबद्दल पोस्ट करत असतात. त्यांची संपत्ती अब्जावधींमध्ये आहे. यामुळेच ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अनेक गाड्यांची निर्मिती करणारे आनंद महिंद्रा स्वतः कोणती गाडी वापरतात माहिती आहे का?
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांचे वाहनांवर प्रचंड प्रेम आहे. ते दरवर्षी लाखो गाड्यांची विक्री करतात. एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा मोटर्सचा चांगलाच दबदबा आहे. स्वतः गाड्यांची निर्मिती करणारे आनंद महिंद्रा हे कोणती गाडी वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आनंद महिंद्रा हे फक्त आणि फक्त त्यांच्या कंपनीची म्हणजेच महिंद्राची वाहने वापरतात. आनंद महिंद्रा महिंद्रा बोलेरो इनव्हेडर वापरतात जी कंपनीने खूप पूर्वी बंद केली आहे. विशेष म्हणजे, ही तीन दरवाजांची एसयूव्ही आहे आणि बोलेरोपेक्षा क्लासी दिसते. यात सॉफ्ट टॉप, साइड फेसिंग बेंच सीट आणि २.५ लीटर डिझेल इंजिन आहे.
याशिवाय आनंद महिंद्रा महिंद्रा स्कॉर्पिओ देखील वापरतात. त्यांच्याकडे पहिल्या पिढीची स्कॉर्पिओ आहे, जी काळ्या रंगाची आहे. या वाहनात ४X४ फीचर देखील उपलब्ध आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ N ही २०२२ मध्ये आलेली गाडी आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांनी आनंद महिंद्रा यांना सुचवल्यावरून त्यांनी या गाडीचे नाव ‘भीमा’ असे ठेवले आहे. स्कॉर्पिओ एनची किंमत १३ लाखांपासून सुरू होते आणि ३४.५२ लाख रुपयांपर्यंत जाते.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आणि मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा वाहनांवर प्रचंड प्रेम आहे. बिझनेसमॅन आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा ऑटो दरवर्षी लाखो गाड्यांची विक्री करते. आनंद महिंद्रा फक्त आणि फक्त त्यांच्या कंपनीची म्हणजेच महिंद्राची वाहने वापरतात.