इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा हे ट्विटरवर अतिशय सक्रीय असतात. त्यामुळेच ते विविध बाबींची वेळोवेळी दखल घेत असतात. तामिळनाडूतील प्रख्यात इडली अम्माची कहाणी त्यांच्यापासून वाचू शकली नाही. अतिशय स्वस्तात इडली विकून अनेकांच्या जेवणाची सोय करणाऱ्या या अम्मांना मात्र स्वतःचे घर नव्हते. यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी शब्द दिला. आणि तो शब्द पाळलाही.
आनंद महिंद्रा यांनी शब्द दिल्यानंतर महिंद्रा कंपनीचे एक पथक इडली अम्माला भेटायला आले. त्यांनी त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांच्याच गावात एक जमीन खरेदी करण्यात आली. तेथे बांधकामाची परवानगी घेऊन अम्मांच्या हस्तेच भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर झपाट्याने घराचे काम सुरू झाले. आणि मातृदिनाच्या दिवशी म्हणजे गेल्या रविवारीच इडली अम्मांना त्यांचे नवे घर सुपूर्द करण्यात आले. या घराचे उदघाटनही अम्मांच्या हस्तेच झाले. इडलीच्या व्यवसायासाठी त्यांना स्वतंत्र आणि मोठा किचन या घरामध्ये देण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महिंद्रा उद्योग समुहाने हा आणखी एक आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. बघा हा व्हिडिओ
எல்லோருக்கும் சந்தோஷம் கொடுக்க தன் வாழ்க்கையை அர்ப்பணம் செய்தவர்க்கு, சிறிது சந்தோஷம் கொடுக்கும் முயற்சியை விட வேறு ஒரு பெரிய சந்தோஷம் இல்லை. pic.twitter.com/KCN7urkSTG
— anand mahindra (@anandmahindra) May 8, 2022