इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आनंद दिघे यांचे पुतणे व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला.
या टीकेनंतर शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली आहे, आनंद आश्रमात ढोल पथक आंनंद आश्रमात आले होते. गणेशोत्सवात संबंधित ढोल पथक आनंद मठात येणे ही मोठी परंपरा असल्याचे सांगण्यात आले. ही परंपरा १९८० पासूनची असल्याची त्यांच्याकडून देण्यात आली. आनंद दिघे हयात असतानादेखील संबंधित ढोल पथक आनंद मठात येत असे आणि जल्लोष होत असायचा. तिच प्रथा आताही सुरु आहे, असे सांगण्यात आले.