नाशिक – अनंत तरंग’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन २०२१ च्या दुसऱ्या दिवशी, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटिरियर डिझायिनर्स, नाशिक चॅप्टर व एमईटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाइन गोवर्धन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वास्तुविशारद, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अभिनय देव यांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट ते फिल्म मेकर पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. जीवनात तुम्ही जसे आहेत तसे चांगलेच आहात या जीवनात अवघड आणि नाकारता येण्यासारखी गोष्ट नाही, अनेक मोटिवेशनल फिल्म त्यांनी दाखवल्या. दिल्ली बेली, ब्लॅक मेल या फिल्मचे चित्रीकरण करतानाचे किस्से सांगून त्यातील प्रसंगही दाखवले. अनेक उत्तम असे सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द त्यांनी सत्तात वापरले. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटिरियर डिझायिनर्स, नाशिक चॅप्टरच्या चेअर पर्सन आर्कि. वैशाली प्रधान इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटिरियर डिझायिनर्स, नाशिक चॅप्टरच्या चेअर पर्सन व सेक्रेटरी रुपाली जायखेडकर उपस्थित होत्या
आज व्हॉलीबॉल, फेस पैंटिंग,फोटोग्राफी ह्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच म्युझिक अँड जॅमिंग हा खेळ घेण्यात आला. श्री. नितीन वावरे यांनी कॅलिग्राफी विषयावर तर शिल्पा देशमुख यांचे भरतनाट्यम हे वर्कशॉप्स आयोजित केले होते. याप्रसंगी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटिरियर डिझायिनर्स, नाशिक चॅप्टर च्या चेअर पर्सन आर्कि. वैशाली प्रधान इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटिरियर डिझायिनर्स, नाशिक चॅप्टर च्या चेअर पर्सन व सेक्रेटरी रुपाली जायखेडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमास मेट स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन चे डायरेक्टर आर्किटेक्ट भालचंद्र चावरे, प्राचार्य आर्किटेक्ट कृष्णा राठी मॅडम व निष्ठा कारखानीस, एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या मार्गदर्शिका डॉक्टर शेफाली भुजबळ मॅडम तसेच प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री संजय पाटील मार्गदर्शन लाभले . इतर मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इन्स्टिट्यूट विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा काकड व कुमारी सेजल रंका यांनी केले अनंत तरंग ” या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनय देव यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढवणारे भाषण केले.