मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा दसरा मेळावा प्रथमच दोन ठिकाणी झाला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर आणि बंडखोर शिंदे गटाचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर झाला. या दोन्ही मेळाव्यांना हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना खरी कुणाची या प्रश्नाचे उत्तरही काही प्रमाणात या मेळाव्यातून मिळेल, असे अंदाज व्यक्त केले जात होते. राजकीय दृष्ट्या हा मेळावा दोन्ही नेते आणि गटांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा होता. त्यामुळे कुणाचा मेळावा अधिक सरस होता, मैदान नक्की कुणी मारलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी विश्लेषण केले आहे. बघा, ते काय म्हणत आहेत
Analysis of Shinde and Thackeray Dasara Melava