नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेली देवी देवतांची चित्रे पाहण्याची संधी नाशिकरांना उपलब्ध झाली आहे. नाशिकच्या तिडके कॉलनीतील इंडेक्स आर्ट गॅलरीत या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. राजा रवी वर्मा यांनी चित्रित केलेली देवी देवतांची २८ चित्रे या प्रदर्शनात असून, त्यांची संपूर्ण माहिती देखील देण्यात आली आहे. या प्रदर्शनात शंभर वर्षापूर्वीची रवी वर्मा प्रेसमधील मूळ स्वरूपातील ओलिओग्राफस पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन खुले आणि निःशुल्क असून, येत्या २ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.