बेंगळुरु (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल चार्जरची पिन चिमुकलीने तोंडात टाकताच तिला विजेचा जोराचा धक्का लागल्याने तिला जीव गमवावा लागला. कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कारवार तालुक्यातील सिद्धरडा गावात बुधवारी ही घटना घडली. मोबाईल चार्ज केल्यानंतर तिच्या कुटुंबियांकडून चुकुन स्वीच चालूच राहिला. याचवेळेस आठ महिन्याच्या चिमुकलीने चार्जरची पिन तोंडात टाकली. त्यामुळे तिला विजेचा जोराचा झटका बसला. त्यात तिचा मृत्यू झाला.
शॅाक बसल्यानंतर या चिमुरडीच्या पालकांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र चिमुरडीचा जीव ते वाचवू शकले नाही.
सानिध्या असे या मुलीचे नाव आहे. संतोष आणि संजना कलगुटकर यांची ती मुलगी आहे. संतोष हे हुबळी वीज पुरवठा कंपनीत (हेस्कॅाम) कंत्राटी कामगार म्हणून काम करतात.
या घटनेप्रकरणी स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेच्या सभोवतालची परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि काही निष्काळजीपणा किंवा सुरक्षेत त्रुटी होत्या का हे तपासण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. जेव्हा लहान मुले आणि विद्युत उपकरणे वापरतात.ते्व्हा पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
तज्ञ काय म्हणतात
मोबाइल चार्जर सुमारे ५ व्होल्ट आणि २ एम्प्सचे आउटपुट देते, जे आपल्या शरीरातील विजेच्या प्रतिकारशक्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसे नाही. परंतु चार्जर आउटपुट टर्मिनलला जीभ किंवा आपल्या शरीराच्या कोणत्याही जखमी भागाला स्पर्श केल्यास त्वचेच्या संरक्षणाच्या अनुपस्थितीमुळे लहान विद्युत शॉक लागतो. परंतु 220V वीज पुरवठा संपर्कात असताना तुमच्या शरीराला गंभीर दुखापत होऊ शकते. तर 11KV पुरवठा १ सेकंदासाठीही संपर्कात आल्यास तुमचे संपूर्ण शरीर जळू शकते.
An eight-month-old baby died after putting a pin of a mobile charger in her mouth