इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात. त्याहीपेक्षा त्या सातत्याने ट्रोल होत असतात. आताही पुन्हा एकदा त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
‘पर्यावरणावर प्रेम करा’
जागतिक पर्यावरण दिवस ५ जून रोजी साजरा होतो. पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सान्निध्यातील फोटो शेअर केले. या फोटोत त्यांनी वेस्टर्न असा ट्रॅक सूट घातला आहे. याच फोटोंवरून अमृता फडणवीस यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात, असं म्हणत अमृता यांनी हे फोटो शेअर केले आहेत. ‘पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला मिठी मारा. स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी निसर्गाचं संरक्षण करा. नेहमी निसर्गाच्या सानिध्यात जा,’ असेही अमृता यांचे म्हणणे आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
अमृता फडणवीस यांच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अमृता यांना नेमकं म्हणायचं काय आहे हे कळायला अवघड आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. “आपण उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात याचे भान ठेवा…” अशा शब्दात काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1665601359964512260?s=20
Amruta Fadnavis Troll Social Media