इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेले काही दिवस उर्फी जावेद फारच चर्चेत आहे. तिच्या कामामुळे तर नक्कीच नाही, पण तिच्या कपड्यांमुळे. तिच्या कपड्यांवरून राजकारणात चांगलाच वाद रंगताना दिसतो आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी काही दिवसांपासून तिच्या कपड्यांवरून रान उठवले आहे. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही वाघ यांनी टीका केली. या सगळ्या वादात आता अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. उर्फीबाबतच्या त्यांच्या वक्तव्यावरून आता पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उर्फीला असं कमी कपड्यात रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली. यानंतर उर्फीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. “डीपी मेरा धासू, चित्रा वाघ मेरी सासू” असं म्हणतानाच ”उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा, अशी कशी तू ग सास, अशा शब्दांत उर्फीने चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
https://twitter.com/uorfi_/status/1612715883071442946?s=20&t=KoHVOyFnP8j7snQnu2HJmg
या वादात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही स्वतःची भूमिका मांडली आहे. एक स्त्री म्हणून उर्फी जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. उर्फी जावेद – चित्रा वाघ वादाबाबत विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “चित्रा वाघ यांनी याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना तसे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते योग्य नाही, असे अमृता फडणवीस सांगतात. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. कारण तुमचं व्यावसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं.”
“याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी मांडले आहेत. माझ्या मते, उर्फीने जिथे व्यावसायिकदृष्ट्या गरजेचे नाही, तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहणं चांगलं आहे. बाकी वैयक्तिक सांगायचं झालं तर उर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काही वावगं वाटत नाही,” असे अमृता यांचे म्हणणे आहे.
Amruta Fadnavis Reaction on Urfi Javed Chitra Wagh Controversy