इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी अतिशय हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यात दिसते आहे की, अमृता या देवेंद्र यांना जिलेबी खाऊ घालत आहेत.
ट्विटमध्ये त्या म्हणतात की, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1550388446417780736?s=20&t=0fxO5tmkndN8ASgRpTNKBg
Amruta Fadanvis Wishes to Devendra on Birthday