मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर विविध नेते आणि व्यक्तींकडून प्रतिक्रीया येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनीही खोचक प्रतिक्रीया दिली आहे. यासंदर्भात अमृता यांनी ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है.
वाघ हे शिवसेनेचे प्रतिक आहे. आणि राऊत यांच्यासारख्या वाघाला अमृता यांनी मांजर म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटची चर्चा होत आहे. तसेच, अमृता यांना संजय राऊत किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रीया दिली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1493551254240624642?s=20&t=LqoKXx-894KaqNSVH0l9Pg