पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांची विविध वक्तव्ये, ट्विट किंवा पोस्ट वेळोवेळी चर्चेला येत असतात. आताही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती दर्शविणारे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारे दोन ट्विट अमृता यांनी केले आहेत. त्याची सध्या भलतीच चर्चा होत आहे.
अमृता यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हा बायकोच्या भावाच्या ताब्यात दिला आहे. तसेच, त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व यावरही टीका केली आहे.
अमृता फडणवीस त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात की,
थोडक्यात उत्तर धावे;
(उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किव्हा सर्व पर्याय निवडून धावे)
उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा?
1 वसूलीच्या ताब्यात
२ विकृत अघाडीच्या ताब्यात
३ लोड shedding च्या ताब्यात
४ Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात
५ गुंडांच्या ताब्यात
एक पर्याय लिहायला विसरलेच ;
६. बायकोच्या भावाच्या ताब्यात …
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1518227877241954305?s=20&t=8irUHY80xmgaTdB-bYlG5Q