नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे गटातील बंडखोरी आणि उद्धव सरकारवरील संकट या काळात देवेंद्र फडणवीस कसे शांतपणे सक्रिय होते, हे त्यांनी उघड केले आहे. त्यातून अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत.
अमृता म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे अनेकदा रात्रीच्या वेळी वेशांतर करुन बाहेर जात असत. कधी-कधी ते अशा वेशभूषेत दिसायचे की मी त्यांना ओळखूच शकत नसायचे. देवेंद्र हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी रात्री कपडे बदलायचे. वेगवेगळे कपडे आणि डोळ्यांवर मोठा गॉगल घालून ते घरातून बाहेर पडत असत. अनेकवेळा मला ओळखताही यायचे नाही.
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेतील भाषणादरम्यान सांगितले होते की, सत्तासंघर्षाच्या काळात जेव्हा सर्व आमदार झोपले होते, तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचे. आता त्याही पुढे जाऊन अमृता फडणवीस यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले होते की, सर्व आमदार झोपलेले असताना मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो, चर्चा करायचो. या टिप्पणीवर देवेंद्र फडणवीस यांनी मान हलवली. यावर बोलताना अमृता म्हणाल्या की, देवेंद्र रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘देवेंद्र सहसा रात्री उशिरापर्यंत काम करतात. यादरम्यान ते जॅकेट घालून घराबाहेर पडत असत. ते चष्मा वगैरे घालायचे. कधीकधी मी त्यांना ओळखूही शकत नसायची. पण काहीतरी मोठं घडतंय असं वाटत होतं. एकनाथ शिंदे यांचे भाषण आपण सर्वांनी ऐकले. यावरून आमदारांमध्ये किती अस्वस्थता होती हे दिसून येते. अशा स्थितीत ती कुठेतरी अशांतता निर्माण करणार होती आणि त्याचा परिणाम शिवसेनेतील वितुष्ट आणि उद्धव सरकारच्या निरोपाच्या रूपाने दिसून आला आहे, असे त्यांनी नमूद केले,
देवेंद्र फडणवीस आणि मी कधी भेटायचो हे माझ्या समर्थक आमदारांनाही माहित नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. विधानसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा सर्व आमदार झोपलेले असत, तेव्हा मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि आमदार उठण्यापूर्वी हॉटेलवर परतायचो. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांनी मान हलवली होती.
Amruta Fadanvis on Eknath Shinde and Devendra Fadanvis Meet during Maharashtra Political Crisis