मुंबई – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या मलिक आणि फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध प्रत्यारोप केले आहेत. त्यावर फडणवीस यांनी ट्विट करुन मलिक यांच्याशी भांडणे म्हणजे डुकराशी कुस्ती खेळण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. या वादात आता अमृता फडणवीस आणि निलोफर मलिक-खान यांच्यातही जुंपल्याचे दिसून येत आहे.
अमृता फडणवीस यांनी मलिक यांच्यासदंर्भात एक ट्विट केले. त्यात म्हटले की, ते बिघडलेले नवाब आहेत. ते सतत पत्रकार परिषद घेत आहेत. या त्यांनी खोटे आणि लबाडच त्यांनी सारे काही ऐकवले. यातून त्यांचा एकच उद्देश दिसतो तो म्हणजे, त्यांना स्वतःच्या जावयाला आणि काळ्या पैशाला वाचवायचे आहे. त्याची तत्काळ दखल निलोफर यांनी घेतली आहे. त्यांनीही ट्विटरद्वारे अमृता यांना उत्तर दिले आहे. जर, तुमची बाजू खरी असेल तर तुम्ही ती बेधडकपणे मांडू शकता. आमचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास. जर, पत्रकार परिषद घेण्याचा हेतू वाईट असता तर केव्हा ना केव्हा तो उघड झाला असता, असे निलोफर यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/nilofermk/status/1458126769446428684?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1458126769446428684%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fmumbai%2Fnawab-maliks-daughter-nilofar-responds-to-amrita-fadnavis-bigde-nawab-575506.html