इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – सध्या देशभरात दिवाळीची धामधूम सुरू आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मोकळेपणाने दिवाळी साजरी करता येत असल्याने सगळ्यांचाच उत्साह दुणावला आहे. या आनंदात अजून भर घालणारी बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचे एक नवीन गाणे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची झलक असलेला एक व्हिडीओ त्यांनी स्वतःच ट्विटरवर शेअर केला आहे.
कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या धुमधडाक्यात सर्व ठिकाणी दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. जल्लोष, आतिषबाजी, रांगोळी आणि ठिकाठिकाणी केलेली सजावट यामुळे वातावरणही आनंदी झाले आहे. उजळून निघाला आहे. अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या म्युझिक अल्बममुळे चर्चेत असतात. यंदा दिवाळी निमित्ताने त्यांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. ॐ जय लक्ष्मी माता … असे या गाण्याचे बोल आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
“दिवाळी २०२२ आणि लक्ष्मी पूजेच्या शुभप्रसंगी माझी लक्ष्मी मातेसाठीची आरती ऐका आणि देवीच्या भक्तीत तल्लीन व्हा, प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता …!” असे कॅप्शन त्यांनी या ट्वीटला दिले आहे. अमृता फडणवीस यांनी गायलेले हे गाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
नुकतेच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते आहे. युट्यूबवरील या गाण्याला १ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर कॉमेंट करत ते गाणे फार चांगलं झाल्याचे सांगितले आहे. त्यांचे हे गाणे सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
Amruta Fadanvis Diwali New Song Release Video