नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील अमरावती येथील एका दुकानदाराच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी सूचना जारी केल्या आहेत. अमरावती येथील औषध दुकानदार उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ उमेशची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय उमेश प्रल्हादराव कोल्हे हे केमिस्टचे दुकान चालवायचे. त्यांनी सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ काहीतरी पोस्ट केले होते. त्यामुळेच २१ जून रोजी त्यांची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने सहा जणांना अटक केली होती. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचवेळी दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारीही या घटनेच्या दहशतवादी पैलूंच्या तपासात गुंतले आहेत. अमरावतीच्या घटनेतील उदयपूर कनेक्शन वायरचा एटीएस शोध घेत आहे.
उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याने मारेकरी कन्हैयालालवर रागावले होते. कपड्याचे माप देण्याच्या बहाण्याने ते टेलर कन्हैयालालच्या दुकानात गेला. आणि फसवणूक करून त्यांचा गळा चिरून खून केला. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ तर बनवलाच, पण त्याच्या कबुलीजबाबाचा व्हिडीओही बनवला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. याप्रकरणीही एनआयए तपास करत आहे.
Maharashtra | Five people arrested in connection with the murder of an Amravati-based shop owner Umesh Kolhe, a local court has extended their Police custody till July 5th. pic.twitter.com/YbFzyOjuzy
— ANI (@ANI) July 2, 2022