मुंबई – अमरावती येथील खासदार नवनीत राणा याचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देतांना दोन लाखांचा दंड आणि सहा आठवड्यात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहे. अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. या मतदारसंघातून नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. माजी सेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही याचिका दाखल केली होती.
खा. नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या समर्थनातून निवडून आल्या होत्या. पण, त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला समर्थन केले. आता कोर्टाच्या निकालानंतर या लोकसभा मतदार संघाचे समीकरणही बदलणार आहे. जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. या निकालानंतर दुस-या क्रमांकाचे उमेदवार माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना संधी मिळते का ? याबाबत चर्चा आहे. दरम्यान या निकालानंतर खासदार राणा या सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकता. दरम्यान या निकालामुळे अमरावतीमध्ये राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.