अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचा प्रश्न सध्या पेटला आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्याचे विविध पडसाद सध्या उमटत आहेत. नाशिक जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदे फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
फडणवीस आज हे अमरावती दौऱ्यावर आहेत. कृषी महोत्सवासह विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. याच दौऱ्यात शेतकऱ्यांचा रोषही समोर आला आहे. फडणवीस यांच्या गाडीवर कांदा फेकण्याचा आणि कांद्याचा प्रश्न किती ज्वलंत आहे हे मांडण्याचे नियोजन शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी केले. मात्र, याची माहिती पोलिसांना लागली. कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या गाडीवर कांदे फेकण्याच्या आगोदरच त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. सध्या नाफेडद्वारे कांदा खरेदी सुरू झालेली असली तरी त्याचा काहीच परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Amravati Devendra Fadnavis Vehicle Onion Throw