अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भलतीच मागणी करीत असल्याने २१ वर्षीय युवतीने प्रियकराला दूर लोटले. अल्पावधितच इन्टाग्रामवर दुसऱ्याशी जबळीक निर्माण झाली. त्याने दबाव टाकून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कळताच पहिल्या पतीचा तडफडाट झाला. त्याने एकांतातील क्षणांचा व्हीडिओ व्हायरल केला. या संपूर्ण प्रकरणात २१ वर्षीय पीडितेने सर्वस्व गमावले. तळेगाव दशासर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
१७ फेब्रुवारी २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यानचा हा संपूर्ण घटनाक्रम आहे. हर्षल चंद्रकांत बाभुळकर (२१) रा. रामनगर, वर्धा व आकाश सिंघाने रा. अंजनवती, ता. धामणगाव रेल्वे अशी आरोपींची नावे आहेत. यांच्याविरूध्द बलात्कार, बदनामी, धमकी आणि आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षलने केले व्हीडिओ व्हायरल
पीडिता फेब्रुवारी २०२२ मध्ये वर्धा येथे गेली होती. तिथे हर्षल बाभुळकरसोबत ओळख झाली. गावी परतल्यावर दोघांमध्ये व्हॉटसॲप चॅट व व्हिडिओ कॉलिंग होऊ लागले. हर्षल नेहमी व्हिडिओ कॉलवर अश्लील कृती करीत होता. त्यामुळे तरूणीने ऑक्टोबर २०२२ पासून त्याच्यासोबत बोलणे बंद केले व त्याच्या मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. पीडितेचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळल्याची माहिती मिळताच हर्षल संतापला. त्याने पीडितेचा मोबाईल हॅक करून आकाशचा नंबर मिळविला. त्यच्याशी संबंध तोड, मला धामनगाव येथे भेटायला ये, असे फर्मान सोडले. तिने नकार देताच हर्षल याने आकाश, पीडिता, तिची मैत्रीण व अन् एकाला पीडितेचे अश्लिल व्हीडिओ पाठविले.
आकाशकडून तीनदा अत्याचार
डिसेंबर २०२२ मध्ये पीडितेची आकाश सिंघाणेसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास आकाशने तिला धामणगाव बस स्टॉपहून तरोडा फाट्यावरील एका शेतात नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोनदा त्याने तिच्यावर बळजबरी केली.
Amravati Crime Young Girl Sexual Assault Rape