इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मधुश्री पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऐवज” या अमोल पालेकर लिखित पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि ऐवजचे लेखक अमोल पालेकर यांची तसेच क्युरेटर संध्या गोखले यांची प्रकट मुलाखत डॉ. वृंदा भार्गवे ह्या घेणार आहेत.
कुसुमाग्रज स्मारक, विशाखा सभागृहात रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी सायं. ६ वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य असून रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे अवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मधुश्री पब्लिकेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.