मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत आरोप – प्रत्यारोपाला जोरदार सुरुवात झाली आहे. एकमेकांवर आरोप करत असतांना आता पातळी सुध्दा सोडली जात आहे. आता ऱाष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांची टोळी पाकीटमारांची असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार यांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढले आणि चिन्ह पण चोरले असेही ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्त्युतर दिले आहे. ते म्हणाले की, अजितदादांबद्दल एकेरी बोलतांना डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घाण वाणीतुन नेहमीप्रमाणे स्वतःची लायकी दाखवली आहे. ते नेमके कुणाची औल्याद आहेत हे मी स्वतः मुंबऱ्यात प्रचार सभेतुन जाहीर सांगणार… त्यांनी त्यांचे गुंडे सभा ऐकायला पाठवावे…चॅलेंज असे सांगत अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील मुंब्रा येथील चंदननगरमध्ये आयोजित सभेत बोलतांना त्यांनी महायुती सरकार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटावर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्यावेळेस ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष शरद पवार यांचा होता. त्यांच्याकडून घड्याळ हिसकावून घेतली. अजित पवार ही पाकीटमारांची टोळी आहे. अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असेही ते म्हणाले. शरद पवार यांना कॅन्सर असून देखील राज्यात बदल घडविण्यासाठी फिरत असल्याचे देखील आव्हाड यांनी म्हटले. ते मोदी आणि शहा यांच्या बरोबर गेले नाहीत. त्यांनी सांगितले होते की या युवांमधून शरद पवार तयार करेल यालाच हिम्मत म्हणतात असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आता मिटकरी यांनी चॅलेंज दिले आहे.