मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे ४८ मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे किर्तीकर यांनी मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. या याचिकेत किर्तीकर यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिका-यांनी नकार दिला. मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाईल नेण्यासाठी परवाणगी दिली असे आरोप केले होते.
अगोरद विजयी नंतर पराभव
निवडणुकीच्या निकाला वेळेस अमोल किर्तीकर हे ६८२ मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकर यांनी फेरमतमीजणीसाठी मागणी केली. यामध्ये वायकर हे ७५ मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली होती. लोकसभेचा निकाल हा ४ जून रोजी लागला होता.