संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संगमनेर येथे फेस्टिवलच्या उदघाटन कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. एका तरुणाने हा हल्ला केला. हात मिळवण्याच्या बहाण्याने या तरुणाने हा हल्ला केला. या तरुणाने हल्ला का केला? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
या हल्लेखोरांना मालपाणी समूहाच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आ. खताळ समर्थकांनी मोठी गर्दी केली. या हल्ल्यामुळे गणेशोत्सवात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
दरम्यान या हल्ल्याचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे. हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.