मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स या लो अॅण्ड हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स कंपनीने यंदा सणासुदीच्या काळात संपूर्ण भारतातील ग्राहकांना स्पेशल ऑफर देण्यासाठी उपक्रम सुरू केला. येत असलेला दिवाळी सण वर्षातील शुभ काळ मानला जातो. या सणादरम्यान सर्वत्र प्रेम व उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी सणादरम्यान हवेचा दर्जा व प्रदूषणाबाबत वाढती चिंता प्रकर्षाने दिसून येते.
यंदा सणासुदीच्या काळात एएमओ ई-बाइक्सचा उपक्रम ‘स्मार्ट लोगो की स्मार्ट चॉईस, एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स’त्यांची हाय-स्पीड ई- स्कूटर जॉण्टी प्लस मर्यादित कालावधीसाठी ७४,४६० रूपये (एक्स-शोरूम किंमत) या स्पेशल ऑफर किंमतीमध्ये सादर करत आहे. यामधून कंपनी ई-मोबिलिटीला चालना देत ग्राहकांना प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करण्यासोबत वाढत्या पेट्रोल दरांना टाळण्याची सुविधा देखील देत आहे.
एएमओ ई-बाइक्स लो-स्पीड व हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्सची श्रेणी उत्पादित करते. या इलेक्ट्रिक स्कूटर्स आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज आहेत आणि जागतिक उद्योग व सुरक्षितता मानकांचे पालन करतात. या स्कूटर्स ई-मोबिलिटीसाठी विश्वसनीय, स्थिर व किफायतशीर सोल्यूशन्स देण्यासोबत उच्च दर्जाचे मानक, दर्जात्मक विक्री-पश्चात्त सेवांसह ४८ तासांनंतर झीरो डाऊन टाइम, कमी मेन्टेनन्स खर्च आणि उच्च दर्जाची कार्यक्षमता देतात.
कंपनीच्या इलेक्ट्रिक बाइक्स शक्ती, स्टाइल, कार्यक्षमता व सुरक्षिततेच्या नवीन दर्जासह येतात. जॉण्टी प्लस बाइकमध्ये ३-वर्षांची वॉरंटी (अटी व नियम लागू), १०८ किमी रेंज देते आणि फेम २ सबसिडी व राज्य सरकार सबसिडींसह (राज्यामध्ये उपलब्ध असल्यास) येते. ऑफरचा लाभ घेण्यासाठी जवळच्या स्थानिक एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स डीलरशिपला भेट द्या.
AMO Electric Bike Diwali Offer Discount
Automobile