मुंबई – असे म्हटले जाते की, मोठी माणसे ही मोठी असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्व आणि विनयशीलता त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा नावलौकिक होतो. तसेच ते लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करतात. असेच लोकप्रियतेचे शिखर गाठले प्रसिद्ध अभिनेते म्हणजेच अमिताभ बच्चन होय. बीग बी अमिताभ बच्चन यांचे हे सध्या ७८ वर्षांचे असून आजही ते बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपती १३ व्या सिझनमध्ये दिसतात. एका समस्येमुळे विलंब झाल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची चक्क माफी मागितली.
कौन बनेगा करोडपती १३ होस्ट अमिताभ बच्चन यांनी याबाबत खुलासा केला की, शूटिंगसाठी ते सकाळी लवकर उठले पण तेव्हाच त्यांना कळले की, घरात पाण्याची समस्या आहे. या संदर्भात बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पोस्ट करत या समस्येचे स्पष्टीकरण केले आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, सकाळी ६ वाजता ते उठले आणि त्यांना कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर जायचे होते. पण तेव्हाच त्यांना कळले की, घरात पाण्याची व्यवस्था नाही, पाणी पुरवठ्यात किंवा नळात बिघाड झाला आहे. त्यामुळे उशीराने यावे लागले त्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफी मागितली. दरम्यान, यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘चेहरे ‘ याबद्दल सांगितले की, काही राज्यांमध्ये अनेक सिनेमागृहांमध्ये तो रिलीज होत आहे. तसेच १३ वर्षापूर्वी आधी त्यांच्या ब्लॉगवर एक हजाराहून अधिक कमेंट्स होत्या, पण आता फक्त १०० कॉमेंट्स येतात. सध्या त्यांचा चेहरे हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला असून याशिवाय झुंड, ब्रह्मास्त्र, मे डे, गुड बाय आणि विल चित्रपट प्रदर्शित होत आहेत.