मुंबई – असे म्हणतात की, हौसेला मोल नसते आणि कला ही अमूल्य असते. सेलिब्रिटी असो की एखादी श्रीमंत व्यक्ती त्यांच्या आलिशान महालामध्ये किंवा बंगल्यात आपल्याला वेगवेगळ्या पेंटिंग्स लावलेले दिसतात. बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील अशाच प्रकारे आगळ्यावेगळ्या आणि रिच पेंटिंग्स आपल्या दिवाणखान्यात लावण्याची आवड आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक चित्र शेअर केले आहे. या चित्रात एक वृषभाचे (बैलाचे ) पेंटिंग दिसत आहे. या पेंटिंगची किंमत ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल.
दिवाळीच्या मुहूर्तावर अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा दिसत होते. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘काही फोटोंमुळे बसण्याची पद्धत बदलत नाही, समय (वेळ ) बदलतो. आता अनेकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. तर या चित्रात दिसणाऱ्या बैलाच्या छायाचित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर दुसरीकडे, एका वेबसाइटनुसार, धुरी पंजाबमध्ये जन्मलेल्या मनजीत बावा यांनी हे पेंटिंग बनवले आहे. अमिताभ बच्चन यांनी या पेंटिंगच्या सौंदर्याबद्दल सांगितले होते की, ‘बैल हे ताकद, धैर्य आणि आशावादाचे लक्षण आहे. हे चित्र घरात ठेवून कोणतीही व्यक्ती आर्थिक परिस्थितीचा बदलून घेऊ शकते. यामुळे नकारात्मकताही कायम दूर राहते.’
अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रात दिसलेल्या पेंटिंगची किंमत आहे तब्बल ४ कोटी रुपये. अमिताभ यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ते इतर अनेक कलाकारांसोबत काम करत आहे.