अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे आज पासून नाशिक जिल्हयाच्या ग्रामीण भागातील दौ-यावर आहे. या दौ-यात ते विद्यार्थी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांशी संवाद साधत आहे. येवला येथे अमित ठाकरेचे आगमन होताच त्यांचे विंचूर चौफुली येथे मनसे पदाधिका-यांनी स्वागत केले. त्यानंतर विद्या इंटरनॅशनल स्कुल येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पदाधिका-यां सोबत चर्चा केली. अमित ठाकरे यांचे फुटबॉल खेळावरील प्रेम सर्वश्रृत आहे. पदाधिका-यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी शाळेच्या फुटबॉल मैदानावर काही क्षण फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.