शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज या विषयावर बैठक…मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थितीत

ऑक्टोबर 7, 2024 | 12:05 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
amit shah11

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादी कारवायांनी (एलडब्ल्यूई), म्हणजेच नक्षलवादाने प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओदिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील.

नक्षलवादाने प्रभावित राज्यांना विकास सहाय्य प्रदान करण्यात सक्रीय सहभाग असलेले पाच केंद्रीय मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहतील. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्र, राज्ये आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) वरिष्ठ अधिकारी देखील या चर्चेत सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा धोका समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या समस्येशी लढण्यासाठी केंद्र सरकार नक्षलवादग्रस्त राज्य सरकारांना शक्य ती सर्व मदत करत आहे.

यापूर्वी 06 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी या समस्येचा खात्मा करण्याबाबत सर्वसमावेशक निर्देश दिले होते. मोदी सरकारच्या रणनीतीमुळे, नक्षलवादाने होणाऱ्या हिंसाचारात तो 72% घट झाली, तर 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये या समस्येमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 86% घट झाली आहे. नक्षलवाद आज आपली शेवटची लढाई लढत आहे.

2024 या वर्षात आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या सशस्त्र कॅडरचा (शाखा) खात्मा करण्यात सुरक्षा दलांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या वर्षात आतापर्यंत 202 नक्षलवादी गटांचा खात्मा करण्यात आला असून, 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांत 723 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर 812 जणांना अटक करण्यात आली. नक्षलवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या कमी होऊन, 2024 मध्ये ती 38 वर आली आहे. केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असून, यात रस्ते आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यात आली, ज्यामुळे नक्षलवादग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागात विकास योजना पोहोचल्या. नक्षलवादाने प्रभावित भागात आतापर्यंत 14400 किमी लांबीचे रस्ते बांधले गेले असून, जवळजवळ 6000 मोबाईल टॉवर बसवले गेले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या दरम्यान सामंजस्य करार…हा आहे फायदा

Next Post

अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद…२०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
image001T5HD e1728239996802

अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद…२०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011