नागपूर – अमित शहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. आणि हाच व्हिडिओ काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनीही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमित शहा सांगत आहेत की, “रावण जेव्हा मरणशय्यावर होता. त्यावेळी त्याच्याकडून ज्ञानाचे धडे घेण्यासाठी प्रभूरामचंद्रांनी भरतला पाठवले होते.” हाच धागा पकडून राऊत यांनी शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शहा स्वतःला कट्टर हिंदू समजतात. मात्र, त्यांना रामायणात नेमके काय घडले हेच माहित नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
रामायणामध्ये प्रभूरामचंद्रांनी लंकेत जाऊन रावणाचा वध केला. श्रीरामांसोबत वनवासामध्ये त्यांची पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण हे सोबत होते. ज्यावेळी रावणाचा वध केला त्यावेळी प्रभूरामांनी लक्ष्मणाला सांगितले की, “रावण हा खुप मोठा तज्ज्ञ आहे. त्यामुळे त्याच्याकडून काही बाबी जाणून घे.” हे सर्वश्रृत आहे. मात्र, अमित शहा यांनी लक्ष्मणाऐवजी भरताचे नाव घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. बघा हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/NitinRaut_INC/status/1459423475064397825