नवी दिल्ली – भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. शहा हे पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात अखेरचे दिसले होते. त्यानंतर ते कुठे गायब झाले आहेत, असा प्रश्न विचारणारी ही तक्रार दाखल केली आहे नागेश करियप्पा यांनी. नागेश हे युवा काँग्रेस (एनएसयुआय)चे नेते आहेत. देशात कोरोनाची गंभीर स्थिती असताना अमित शहा कुठेच दिसत नसल्याचा प्रश्न नागेश यांनी विचारला आहे.
https://twitter.com/Nagesh_nsui6/status/1392420729346428930?s=03