कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री श्री शाह यांचे स्वागत केले.
आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यकर्ता संवाद बैठक, पश्चिम महाराष्ट्र विभाग संपन्न झाली. यावेळी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा भाजपामध्ये प्रवेश केला.