इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत. या बैठकीत जवळपास एक तासांपासून जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
अगोदर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर महायुतीची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर प्राथमिक चर्चा सुरु झाली. या बैठकीत भाजपला १५५ जागा, शिंदे गटाला ७५ जागा, अजित पवार गटाला ५५ जागा देण्यात येणार असल्याची प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीनंतर भाजचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, काही जागावाटपाबाबत आमच्यात कोणाताही वाद नाही. समोपचाराने चर्चा होत आहेत. अंतिम जागावाटप होईल तेव्हा कोणती जागा कोण निवडेल ते आम्ही जाहीर करु असे सांगितले. अमित शाह यांचा दौरा मंगळवारी दुपारी नागपूर, संध्याकाळी संभाजीनगर, बुधवारी दुपारी नाशिक आणि संध्याकाळी कोल्हापूर असा आहे. विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी या बैठकीचं आयोजित करण्यात आले आहे. त्यात विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे.