इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाममध्ये हल्ल्या करणारे तीन दहशवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत दिली. लोकसभेत काल आणि आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी अमित शाह यांनी पहलगामध्ये पर्यटकांवर हल्ला करणा-या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे सांगितले. ही कारवाई जम्मू काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्याने केली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात २६ जण ठार मारले गेले होते. तेव्हापासून या दहशवाद्यांचा शोध सुरु होता. दरम्यान सोमवारी सुरक्षा दलांनी दहशवाद्यांना ठार मारले. त्यानंतर आज गृहमंत्री यांनी ही माहिती दिली.
ठार करण्यात आलेल्या दहशवाद्यांमध्ये सुलेमान, जिब्रान आणि अफझल हे दहशतवादी आहे. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता. त्याही दहशवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.