मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विकसित आणि समृद्ध लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. त्यांनी सांगितले की, झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू – काश्मीरमध्ये असलेले ३७० कलम हटवले होते. त्यानंतर जम्मू – काश्मीर आणि लडाख वेगवेगळे केले होते. जम्मू – काश्मीरला राज्याचा दर्जा दिला तर लडाख केंद्रशासित प्रदेश ठेवले. त्यापूर्वी लडाख हा जम्मू- काश्मिरचा भाग होता.
सध्या लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल हे दोन जिल्ह्यांच्या प्रदेशात आता पाच जिल्हे झाले आहे. त्यामुळे लडाख सात जिल्ह्याच प्रदेश असणार आहे.