मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. तशी माहिती मनसेच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली आहे. अमित यांनी म्हटले आहे की, शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकताच घेतला. तुम्ही सर्वांनीही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1386343021734600704