मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदरच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याच्या चर्चेवर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्वीट करत काल गंभीर इशारा दिला होता. या इशा-यानंतर हा चित्रपट बनवणारे अमित जानी यांनी त्याला प्रत्त्युत्तर दिले आहे. चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेचं काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही. मी १९ तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला रोखू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
अमिक जानी हे ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाचे निर्माते आहे. ते उत्तर प्रदेशच्या मेरठचे निवासी आहेत. उत्तर प्रदेश-बिहारचे प्रोड्युसर, अभिनेते आणि प्रोडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यावेळी जानी यांनी मुंबईला बसलेल्या लोकांच्या हाताला हा चित्रपट लागला नाही. म्हणून ते नाराज आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांची पार्टी चिडली असे त्यांनी सांगत मुंबईतच काम करणार असे म्हटले आहे.
अमेय खोपकर यांनी दिला होता हा इशारा
अमेय खोपकर ट्वीटरवर पोस्ट शेअर करत सांगतिले की ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत ? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!’
The producer of ‘Karachi to Noida’ gave this reply to MNS’s
Amit Jani Serious Allegation MNS Amey khopkar
Politics Seema Haider